बेळगाव : शहरात मतदार फेर निरीक्षण (SIR) प्रक्रिया सुरू असून, या प्रक्रियेचे अर्ज फक्त कन्नड भाषेत उपलब्ध करण्यात आले असून, बेळगावमध्ये बहुसंख्य मराठी भाषिक असल्याने सदर अर्ज मराठीत उपलब्ध करून द्यावेत यासाठी महानगर पालिका आयुक्त तथा शहर निवडणूक अधिकारी यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी तसेच मराठी भाषिकांनी शुक्रवार दिनांक ०३ जुलै रोजी दुपारी १२.०० वाजता बेळगाव महानगरपालिकेत उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
July 3, 2026
समाजसेवक गणेश दड्डीकर यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन बेळगाव : डेक्कन हॉस्पिटलसमोरील बसवेश्वर रेल्वे उड्डाणपुलाजवळील न्यू गुड्स शेड रस्त्याची तात्काळ कायमस्वरूपी दुरुस्ती करून दोन्ही बाजूंना जलनिस्सारण गटारी […]








