बेळगाव : कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या तलावात संरक्षक भिंत कोसळून दोन मुलांचा बळी गेला, या तलावाची पुनर्बांधणी करून प्रशासनाने सुरक्षितता वाढवावी, या मागणीसाठी व संदर्भात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग व नागरिकांच्या वतीने उद्या मंगळवार दि. ५ मे रोजी सकाळी ११ वा. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. तरी कपिलेश्वर मंदिर परिसरातील नागरिक व इतरांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.