• मलप्रभा नदीकाठावर संचार
  • शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण

खानापूर : तालुक्यातील मोदेकोप्प गावात मलप्रभा नदीच्या काठावर हत्ती दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे.

गावातील बळीराम गौडा यांच्या शेताजवळ हा हत्ती दिसून आला. तो नदीलगतच्या परिसरात काही वेळ फिरत होता. हा भाग केळी, काजू, सुपारी आणि आंब्याच्या बागांनी समृद्ध असूनही, सुदैवाने हत्तीने कोणत्याही पिकांचे नुकसान केल्याची नोंद नाही.प्राथमिक माहितीनुसार, हत्ती काही वेळ मोदेकोप्प परिसरात फिरल्यानंतर मलप्रभा नदी ओलांडून पुढील दिशेने निघून गेला.