बेळगाव : बेळगाव नगरीचा सुपुत्र आणि अष्टपैलू जलतरणपटू अमन अभिजीत सूणगार याने मलेशिया येथे झालेल्या ६८ व्या मलेशिया खुल्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना १ रौप्य, १ कांस्यपदक संपादन करत अतुलनीय कामगिरी करत बेळगावचे नाव उज्वल केले. अमन सुणगार याने पुरुषांच्या खुल्या गटातील १०० मीटर बॅक स्ट्रोक स्पर्धेत दुसऱ्या क्रमांक सहा रौप्य पदक तर २०० मीटर्स बॅक स्ट्रोक स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकासह कांस्यपदक संपादन केले. अमन सुणगार याला आई वसुंधरा व वडील अभिजीत सुणगार यांचे प्रोत्साहन मिळत आहे.