बेळगाव : येथील कॉलेज रोडवरील सुप्रसिद्ध विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटीचा पंधरावा वर्धापन दिन मंगळवारी ( २९ सप्टेंबर) उत्साहात साजरा झाला. चेअरमन कुमार पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रज्ञा शानभाग व महादेव काळे हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी चेअरमन कुमार पाटील, व्हाईस चेअरमन प्रा. दत्ता नाडगौडा, ज्येष्ठ संचालक अविनाश कुलकर्णी व इतरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास संचालक प्रशांत पाटील, संकेत कुलकर्णी, किरण धामणेकर, अनंता शेट यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
यानंतर महादेव काळे यांचा व्हाईस चेअरमन प्रा. दत्ता नाडगौडा व संचालक अविनाश कुलकर्णी यांच्याहस्ते आणि प्रज्ञा शानभाग यांचा संचालिका नीता कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. सेक्रेटरी पद्मा बाडकर यांनी सोसायटीच्या आर्थिक प्रगतीची माहिती दिली.
ज्येष्ठ संचालक अविनाश कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना कोणत्याही संस्थेची प्रगती ही सभासदांच्या असलेल्या विश्वासामुळे होत असते. विवेकानंद सोसायटीने मिळविलेले यश हे याचेच द्योतक आहे, असे मत व्यक्त केले.
समारंभास सल्लागार मंडळाचे सदस्य राहुल अंगडी, श्रीकांत पाटील, धनुजा पाटील यांच्यासह बहुसंख्य सभासद व हितचिंतक उपस्थित होते. कर्मचारी सोनम मंगणाकर यांनी स्वागत केले व अर्चना दरवंदर यांनी आभार मानले. सविता चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.








