- गणेशपुर येथील घटना
बेळगाव / प्रतिनिधी
ट्रान्सफॉर्मर बसवलेल्या खांबाच्या ठिकाणी विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने एका म्हशीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दुर्गामाता कॉलनी, गणेशपुर येथे आज रविवारी दुपारी घडली.
विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेली म्हैस दुर्गामाता कॉलनी येथील बाळू अशोक पाटील यांच्या मालकीची होती. पाटील हे आज नेहमीप्रमाणे दुपारी आपल्या म्हशी चरावयास घेऊन जात होते. त्यावेळी एक म्हैस ट्रान्सफॉर्मर असलेल्या खांबा खालील गवत चरण्यास गेली असता त्या ठिकाणी लोणकरणाऱ्या जिवंत विजेच्या स्पर्शाने जागीच गतप्राण झाली. मृत्युमुखी पडलेली म्हैस दुभती असल्यामुळे बाळू पाटील यांचे लाखाचे नुकसान झाले असून हेस्कॉमने ही नुकसान भरपाई भरून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.