• सुळगा (हिं.) येथील साई कॉलनीतील महिलांचा सामूहिक उपक्रम

सुळगा (हिं.) : दीपावलीच्या पहिल्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या वसुबारस सणानिमित्त सुळगा (हिं.) येथील साई कॉलनीत सासू-सून ग्रुपच्या महिलांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने वासराचे पूजन केले.

भारत हा कृषिप्रधान देश असून शेतीमध्ये पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शेतकरी शेतीची कामे करताना गाई-बैलांसह अन्य जनावरांची मोठी मदत होते. या पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासराचे पूजन करण्याची परंपरा आहे. याच परंपरेनुसार सासू-सून ग्रुपच्या महिलांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही एकत्र येऊन वसुबारस सण साजरा केला.

याप्रसंगी सौ. लक्ष्मी भरमा पाटील, सौ. श्वेता परशराम कदम, सौ. रेखा अजित कलखांबकर, सौ. वनिता मल्लाप्पा कदम, सौ. सुनीता महादेव कलखांबकर आणि सौ. राजश्री रोहन आदी ग्रुपमधील महिला सदस्य उपस्थित होत्या.