- कावळेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती प्रतिष्ठापना व उद्घाटन सोहळ्याचे दिले निमंत्रण
बेळगाव : बेळगाव ग्रामीण भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
भाजपचे उत्तर कर्नाटक विभाग प्रभारी संजय पाटील यांच्यासोबत भाजप बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष विनय विलास कदम, बेळगुंदी जिल्हा पंचायतचे माजी सदस्य मोहन मोरे आणि कुद्रेमनी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष संजय पाटील यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली.
यावेळी कावळेवाडी गावात १० डिसेंबर रोजी आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन मूर्ती प्रतिष्ठापना व उद्घाटन समारंभासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विशेष निमंत्रण देण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक चांदीलकर उपस्थित होते.







