बेळगाव : कंग्राळकर गल्ली येथील रहिवासी तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते श्री. अनिल वाडेकर (वाघमारे) यांच्या मातोश्री श्रीमती. शारदा अनंत वाडेकर यांचे आज शनिवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वा. अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव सून, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार उद्या रविवारी सकाळी ११ वाजता सदाशिव नगर स्मशानभूमीत होणार आहे.