बेळगाव / प्रतिनिधी
उन्हाळी सुट्टीनंतर जुलै महिन्यापासून सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीचे उच्चाधिकार समितीची बैठक घ्यावी अशी मागणी, महाराष्ट्र सरकारकडे करण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात बैठक घेण्यात येईल अशी माहिती देण्यात आली होती. तरीही बैठक लवकरात लवकर व्हावी यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पाठपुरावा केला जात आहे.अशी माहिती मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे यांनी दिली आहे.
सीमाप्रश्नी नेमण्यात आलेल्या उच्चा अधिकार समितीची बैठक लवकरात व्हावी यासाठी पाठपुरावा केला जात आहे.त्यातून जून महिन्यात मुंबई येथे उच्च अधिकार समितीचे बैठक पार पडण्याची शक्यता आहे. मध्यवर्ती समितीतर्फे बैठक लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत समन्वयक मंत्री, अधिकाऱ्यांची संपर्क साधला जात आहे. समितीतर्फे पाठपुरावा करण्यात आल्यानंतर बैठक घेण्याची ही तयारी केली जात आहे. लवकरच याबाबतची तारीख अंतिम केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर बैठक होण्याची शक्यता आहे. बैठक पार पडल्यानंतर मध्यवर्ती समितीच्या प्रलंबित मागण्या दूर होण्यास मदत होणार आहे.