- जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहर, खानापूर तालुका तसेच कित्तूर तालुका परिसरात होत असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव, खानापूर, कित्तूर तालुक्यातील सरकारी अनुदानित विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळा आणि पदवी पूर्व कॉलेजला उद्या गुरुवार दि. 26 जून रोजी पुन्हा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी याबाबतची सूचना प्रसिद्धीस दिली आहे.