बेळगाव / प्रतिनिधी
रिक्षा भाड्याचे पैसे मागितल्याने चार ते पाच जणांच्या टोळक्याने एका ऑटो रिक्षाचालकावर जबर हल्ला करून त्याला मारहाण केली. बेळगाव समर्थनगरमध्ये आज बुधवारी सकाळी ही घटना घडली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार चार ते पाच जणांच्या टोळक्याने बसस्थानकावरून रिक्षात बसून समर्थनगरपर्यंत सोडण्यास सांगितले. यानंतर रिक्षाचालक अल्ताफ हुसेन यांनी ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर त्यांच्याकडे रिक्षाचे भाडे मागितले. त्यावेळी चार-पाच जणांच्या टोळक्याने लाकडी काठीने त्यांच्यावर हल्ला केला आणि तेथून पळ काढला. जखमी चालक अल्ताफ यांना स्थानिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.