- प्राधिकरणाने मागवल्या निविदा
बेळगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्तीच्या श्री रेणुका यल्लम्मा देवीच्या मंदिरात आता भाविकांसाठी बाटलीबंद तीर्थप्रसाद मिळणार आहे. अनेक भाविक देवीच्या कुंडातील तीर्थ घेण्यासाठी रिकाम्या बाटल्या वापरतात, ही पद्धत बंद करण्यासाठी आणि स्वच्छ, अधिकृत व्यवस्था करण्यासाठी मंदिर विकास प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे.
यापुढे मंदिराच्या सेवा काउंटरवर आणि थेट तीर्थ कुंडाजवळच भाविकांना सीलबंद बाटलीत तीर्थप्रसाद मिळेल. त्यामुळे स्वतःची बाटली आणण्याची गरज राहणार नाही.
या उपक्रमासाठी सप्टेंबर 2026 ते मार्च 2027 या कालावधीसाठी बाटल्या पुरवठा करण्याकरिता कर्नाटक सरकारच्या ई-प्रोक्युअरमेंट पोर्टलवर ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यातील इतर मोठ्या मंदिरांच्या धर्तीवरच हा उपक्रम सुरू होत आहे.








