
सौंदत्ती / वार्ताहर
दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि जागरूक धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या सौंदत्ती यल्लम्मा मंदिराच्या हुंडीची मोजणी गुरुवारी पूर्ण झाली. यावेळी १.०४ कोटी रुपये जमा झाले आहेत. याबद्दल माहिती देताना सौंदत्ती यल्लम्मा मंदिर प्राधिकरणाचे सचिव अशोक दुडगुंटी म्हणाले की, जमा झालेल्या संपत्तीमध्ये एकूण एक कोटी चार लाख रुपये यांचे दान आहे त्यामध्ये ५.२२ लाख रुपये किमतीचे ५३ ग्रॅम सोन्याचे दागिने, १.२७ लाख रुपये किमतीचे १,२७६ ग्रॅम चांदीचे दागिने आणि ९८.२३ लाख रुपये रोख जमा झाली आहे. देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक प्रार्थना करण्यासाठी मंदिरात येतात. त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते मंदिराच्या हुंडीमध्ये केवळ रोख रक्कमच नाही तर सोन्या-चांदीचे दागिने देखील ठेवतात आणि त्यांची भक्ती करतात.यल्लम्मा मंदिर प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी, मंदिराचे अधिकारी, धार्मिक बंदोबस्त विभागाचे कर्मचारी, सावदट्टीचे तहसीलदार आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही हुंडी फोडण्यात आली.धार्मिक बंदोबस्त विभागाचे अधिकारी बाळेश आब्बाई, एम.पी. द्यामणगौडर, अल्लामा प्रभु प्रभुनावर, व मंदिराचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.