• युवा समिती सीमाभागचे हिशोब तपासणीस राजू पाटील यांना मातृशोक

बेळगाव : आचार्य गल्ली शहापूर येथील रहिवासी सौ. यमुना सोमनाथ पाटील (वय ७६) यांचे आज शनिवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वा.अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पती, दोन चिरंजीव, सुना दोन कन्या, जावई, नातवंडे आणि पणतवंडे असा परिवार आहे. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी सरचिटणीस स्वर्गीय एल.आय.पाटील यांच्या त्या भगिनी होत. अंत्यसंस्कार आज दुपारी १२ वा. शहापूर स्मशानभूमीत होणार आहे.