येळ्ळूर : मराठी मॉडेल स्कूल येळळूर येथील शिक्षिका सौ. शोभा राजाराम निलजकर यांना यावर्षीचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्कार शिक्षक दिनानिमित्त गांधी भवन या ठिकाणी दुपारी ३ वाजता प्रदान करण्यात येणार आहे.

यापूर्वी त्यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०१४ मध्ये मिळालेला होता. मराठी मॉडेल स्कूलच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या २६ वर्षापासून प्रामाणिकपणे झटत आहेत. त्यानी मागील चार वर्षे प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून शाळेचा उत्तम कार्यभार सांभाळला होता. त्यांच्या कारकिर्दीत शाळेचा सर्वांगीण विकास झाला आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.