बेळगाव : तणाव दूर करण्यासाठी, ऊर्जेचा समतोल साधण्यासाठी, मन शांत करण्यासाठी आणि स्वतःच्या अंतरात्म्याशी पुन्हा जोडले जाण्यासाठी पाही वाईब्स फाउंडेशनच्या वतीने सामूहिक हीलिंग आणि ध्यान (Group Healing & Meditation) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. डॉ. श्रीदेवी रेवण्णावर यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यक्रमातून सहभागी नागरिकांना हीलिंग, विश्रांती, सकारात्मक ऊर्जा आणि आंतरिक शांततेचा अनुभव घेता येणार आहे. हा कार्यक्रम स्नेहा वास्तू, पहिला मजला, सोमवारपेठ, पाटील डेअरीसमोर, रिलायन्स फ्रेशच्या मागे, टिळकवाडी, बेळगाव येथे होणार आहे.
तणावमुक्ती, ऊर्जेचा समतोल आणि मानसिक शांततेसाठी सामूहिक ध्यान व हीलिंगचा अनुभव घेण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. शांत आणि प्रसन्न वातावरणात स्वतःसाठी काही वेळ देत मनाला नवचैतन्य देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे.
पाही वाईब्स फाउंडेशनच्या “Safeguarding our future together” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात नागरिकांनी मोकळ्या मनाने सहभागी होऊन सामूहिक हीलिंगच्या शक्तीचा अनुभव घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९७३१७१७९०५








