बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.अर्जुनराव नागोजी गोरल (वय ७७) वर्षे यांचे आज गुरुवार दि. २१ मे २०२६ रोजी दुपारी २.३० वा निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन कर्ते चिरंजीव, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
अंत्यविधी उद्या शुक्रवार तारीख २२ रोजी सकाळी १० वाजता मंगाई नगर येथील त्यांच्या पोल्ट्री फार्म जवळ होणार आहे. त्यांच्या निधनाने सीमाभागावर शोककळा पसरली आहे. समिती कार्यकर्त्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.








