- पोलीस आयुक्तांकडून भूमिका स्पष्ट
बेळगाव : बेळगाव शहरातील रिक्षा संघटनाने मीटर सक्तीला तीव्र विरोध केला आहे. इंधन दरवाढ,देखभाल खर्च आणि शहरातील वाहतूक परिस्थिती याचा विचार करून भाडे दर पुनर्निर्धारित करावे अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान याचवेळी शहरातील ऑटो रिक्षामध्ये मीटर सक्तीने निर्माण झालेल्या वादावर पोलीस आयुक्तांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. मीटर सक्ती लागू करण्याचा निर्णय हा प्रादेशिक परिवहन विभाग आरटीओ यांचा आहे. पोलिसांची भूमिका केवळ कायद्याची अंमलबजावणी व सुव्यवस्था राखणे इतपत मर्यादित आहे असे त्यांनी सांगितले आहे.
माळ मारुती पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त भूषण बोरसे म्हणाले, मीटर सक्ती निर्णय हा आरटीओच्या अखत्यारीतील विषय आहे.त्यांनी मीटर सक्ती जारी करावी आणि या दरम्यान भाडे आकारणी बाबत तक्रारी झाल्यास त्यावर पोलीस कार्यवाही करतील असे त्यांनी स्पष्ट केले.








