बेंगळूर : बेकायदेशीर मालमत्तांच्या पार्श्वभूमीवर लोकायुक्त पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून तपासणी केली आहे. या धाडसत्रामुळे राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. बेंगळुरूमध्ये १२ ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या आहेत. लोकायुक्तांनी तुमकुरमधील ७, बेंगळुरू ग्रामीणमधील ८, यादगीरमधील ५, मंगळुरू मधील ४ आणि विजयपूर मधील ४ ठिकाणी छापे टाकले. मागील महिन्यात देखील अशाच प्रकारे धाडसत्र राबवून बेळगावसह अन्य ठिकाणी अधिकाऱ्यांवर बडगा उगारण्यात आला होता.
November 15, 2025
मंत्रिमंडळ फेरबदलाचा निर्णय हायकमांडच्या अखत्यारीत दावणगेरे : “बिहार आणि कर्नाटकातील मतदारांचे विचारसरणीचे स्वरूप एकमेकांपेक्षा भिन्न आहे. त्यामुळे कर्नाटकात सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढील पाच वर्षे पदावरच राहतील,” […]








