• धारदार शस्त्रांनी हल्ल्याचा आरोप ; मुरगोड पोलिसांकडून तपास सुरू

बेळगाव : किरकोळ कारणावरून उद्भवलेल्या कौटुंबिक वादाचे पर्यवसान दोन सख्ख्या भावांच्या निर्घृण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना यरगट्टी तालुक्यातील नुग्गानट्टी गावात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृतांची ओळख लगमप्पा रामण्णवर (वय ३२) आणि बसप्पा रामण्णवर (वय ३८) अशी झाली आहे. दोघांवर त्यांच्या नातेवाईकांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचा प्राथमिक आरोप असून, हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच मुरगोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास मुरगोड पोलीस करत असून, हत्येमागील नेमके कारण आणि संबंधितांची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे.