बेळगाव : बेळगावच्या शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील अत्यंत परिचित, सरळस्वभावी आणि अजातशत्रू व्यक्तीमत्व तथा मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष  श्री. राजेश नाथाजीराव हलगेकर (वय ५८ वर्षे) यांचे मंगळवार दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. शिक्षणमहर्षी दिवंगत नाथाजीराव हलगेकर यांचे ते चिरंजीव आणि मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांचे बंधू होत.

गेली अनेक वर्षे मराठा मंडळ संस्थेत संचालक म्हणून कार्यरत असताना, त्यांनी संस्थेच्या जडणघडणीत आणि उभारणीत अत्यंत मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या जाण्याने मराठा मंडळ परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन कन्या असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष आणि संस्थेचा शिलेदार अकाली गेल्यामुळे मराठा मंडळ शिक्षण संस्थेसह बेळगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे.