बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, शिवराज पाटील, उमेश पाटील, सुहास हुद्दार, श्रीकांत कदम, सुहास चौगुले आदी उपस्थित होते.








