बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती युवा समिती कार्यालय टिळकवाडी बेळगाव येथे साजरी करण्यात आली.

अध्यक्ष अंकुश केसरकर आणि खजिनदार विनायक कावळे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले की बाबासाहेबांनी लोकशाही बळकट करण्यासाठी आणि आपले हक्क मिळविण्यासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे सांगितले होते. तेव्हा आपण संघटित होऊन सीमाप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. तसेच आजच्या काळात बाबासाहेबांच्या विचारांवर चालायची गरज असून सिमालढा आजपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीची तत्वे आखून दिली आहेत त्यानुसारच लढला जात आहे आणि याच लोकशाही मार्गाने न्याय नक्की मिळेल अशी आशा व्यक्त केली.

यावेळी सरचिटणीस श्रीकांत कदम, उपाध्यक्ष वासू सामजी, विनायक कावळे, किरण हुद्दार, सुरज कुडूचकर, राकेश सावंत, महांतेश अलगोंडी, आकाश भेकणे, प्रतीक पाटील, महेश चौगुले, अश्वजीत चौधरी, विशाल गौंडाडकर आदी उपस्थित होते.