सुळगा (हिं.) : उद्या शनिवार दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता भारतीय जनता पार्टी, बेळगाव ग्रामीणच्या वतीने पश्चिम बेळगाव परिसरात गणपती सणाच्या तोंडावर हेस्कॉमकडून वारंवार होत असलेल्या लोडशेडिंग तसेच सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याच्या समस्येबाबत निवेदन देण्यात येणार आहे.

शेतीसाठीचा वीजपुरवठाही सुरळीत करण्याच्या मागणीसाठी भाजप नेते विनय विलास कदम यांच्या नेतृत्वाखाली हिंडलगा सेक्शन ऑफिसर व बेनकनहळ्ळी सेक्शन ऑफिसर यांना निवेदन देण्यात येणार आहे.

यावेळी सर्वांनी उद्या सकाळी ठीक १० वाजता फॉरेस्ट नाका, हिंडलगा येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.