- दोन प्रवासी जखमी
- स्टेअरिंग लॉक झाल्याने बस झाडावर आदळली
खानापूर : तालुक्यातील खानापूर–बिडी मुख्य मार्गावर कुनकीकोप्प गावाजवळ पर्यटक बसचा अपघात झाला. बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन धडकली.
या अपघातात बसमधील दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलीस ठाणे येथील हवालदार रामप्पा खेमाले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी वाहतूक सुरळीत ठेवण्याबरोबरच जखमी प्रवाशांना आवश्यक मदत व पुढील प्रवासासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. अपघातानंतर तत्परतेने मदतकार्य केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.








