कावळेवाडी : येथील प्राथमिक शाळेत महापालक मेळावा आयोजित करण्यात आला होता अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष अॅड नामदेव मोरे उपस्थित होते.सरस्वती प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
या पालक सभेत गावातील दिव्यांग मुलगी आराधना प बडसकर व तिची आजी लक्ष्मी बडसकर यांचा भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला. आराधना ही गेली दहा वर्षे घरातच व्यंगत्व असल्याने बाहेर पडत नव्हती. ही गोष्ट मुख्याध्यापक अविनाश कांबळे यांच्या निदर्शनास आले.त्यांनी तिला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अथक परिश्रम घेऊन शिक्षण हक्क कायद्यानुसार सरळ चौथी इयत्तेत प्रवेश दिला. विशेष म्हणजे पालकांनी शिक्षकांवर विश्वास ठेवून तिचे भविष्य उज्ज्वल होईल या आशेने शाळेत रुजू केले.
शाळेतील इतर मुलांच्या सहवासातून ती सध्या हसते,बागडते बराचसा फरक जाणवतो आहे.शिक्षक हा शिल्पकार आहे मातीच्या गोळ्याला आकार देतो हे सिद्ध होते शाळा सुधारणा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षक व तिच्या पालकांचे कौतुक केले.
समुपदेशकाची भूमिका महत्त्वाची असते. वंचित, दिव्यांग विद्यार्थीनीचा सन्मान करण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त केले यावेळी शाळा सुधारणा कमिटीचे उपाध्यक्ष तेजस्वीनी सुतार, सदस्य रघुनाथ मोरे, शशिकांत गावडे, राजाराम मोरे, एन. आर. मोरे, गणपती कणबरकर, राजश्री यळुरकर,भारता कणबरकर, मंदिरा ओऊळकर उज्ज्वला जाधव तसेच शिक्षक ज्ञानेश्वर चिंगळे निल्लवा हुक्केरी आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन वैशाली किल्लेकर, आभार स्वप्निल सवदी यांनी केले. पालक मेळावा व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला.








