बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगाव येथील इयत्ता पाचवी ‘ब’ मधील विद्यार्थिनी अन्शाराह शोएब मुल्ला हिने आपल्या उत्कृष्ट शब्दलेखन कौशल्य, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व व मेहनतीच्या जोरावर WIZ International Spell Bee या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पेल बी परीक्षेत अन्शाराहने उत्तम कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. तिच्या या यशामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी नवी प्रेरणा मिळाली आहे.
शालेय प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात प्रगती करण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन व योग्य दिशा मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेमार्फत विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. अन्शाराहच्या या यशाबद्दल शालेय प्राचार्य श्री. प्रदीप पाटील, शिक्षकवृंद व पालकांनी तिचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.








