बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प येथील विद्यार्थी अवनीश पी. चव्हाण याने चित्रकला क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. ‘चित्रांकन – एक्सलन्स थ्रू ड्रॉईंग’ या स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक पटकावून शाळेचा गौरव वाढवला.

रोटरॅक्ट क्लब ऑफ वेणुग्राम, बेळगाव यांच्या वतीने या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या कॅटेगरी २ मध्ये अवनीशने आपल्या कलागुणांच्या जोरावर अव्वल स्थान मिळवले.

अवनीशच्या या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन प्रा. आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रो. आर. एस. पाटील, सेक्रेटरी प्रो. नितीन घोरपडे, प्राचार्य प्रदीप पाटील आणि उपप्राचार्य मनोहर करडी यांनी त्याचे अभिनंदन केले. तसेच भविष्यातील शैक्षणिक व कलात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.