बेळगाव / प्रतिनिधी
आधार एज्युकेशन सोसायटी संचालित मंडोळी रोड येथील जोशी सेंट्रल पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई च्या प्रार्थनेसह दिंडी काढली. आणि आसपासच्या भागातून निघालेल्या या बालचमुच्या दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. बालकांनी पारंपारिक वेशभूषेत या दिंडीमध्ये सहभाग घेतला होता. शाळेचे प्राचार्य डॉ. अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम पार पडला. विद्यार्थी वर्गाने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून विठ्ठल भक्तीचे दर्शन घडविले. शाळेतील शिक्षक वर्गाने पुढाकार घेतला होता.








