• अतिरिक्त फेरीची घोषणा

हुबळी : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने हैदराबाद–बेळगाव–हैदराबाद साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांच्या सेवेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार प्रत्येक दिशेने एक अतिरिक्त फेरी चालवण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक ०७०४३ हैदराबाद–बेळगाव विशेष, जी पूर्वी ३० एप्रिल २०२६ पर्यंत धावणार होती, ती आता ७ मे २०२६ रोजी अतिरिक्त फेरी धावेल. त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक ०७०४४ बेळगाव–हैदराबाद विशेष, जी १ मे २०२६ पर्यंत नियोजित होती, ती ८ मे २०२६ रोजी अतिरिक्त फेरी चालवली जाणार आहे.

या निर्णयामुळे दोन्ही शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार असून, वाढत्या गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.