बेळगाव : मूळचे कडलगे, (ता. चंदगड) आणि सध्या टीचर्स कॉलनी हिंडलगा येथील रहिवासी तुकाराम कृष्णा उर्फ टी. के. पाटील (वय 77) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत होणार आहेत. त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रत्येक लढ्यात अग्रेसर राहून भाग घेतला होता. माजी आमदार राजाभाऊ माने यांच्या सोबत त्यांनी सीमा लढ्यात त्यांनी मोठे संघटना कार्य केले होते. त्यांच्या निधनामुळे सीमा लढ्याचे मोठे नुकसान झाले आहे अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
April 30, 2026
बेळगाव : पतीकडून घरात डांबून ठेवून शारीरिक व मानसिक छळ सहन करणाऱ्या एका महिलेची आणि तिच्या दोन लहान मुलांची ‘अक्का पथका’ने सुटका केली असून आरोपी पतीला […]







