बेळगाव : बेळगावचे प्रसिद्ध चित्रकार महेश होनुले यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबई येथे काला घोडा द आर्ट एंट्रन्स गॅलरी या कलादालनात भरले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन नॅशनल अवार्डेड क्रिएटिव्ह फिल्म डायरेक्टर दीपक एस. व्ही. आणि जगप्रसिद्ध जलरंग चित्रकार विकास पाटणेकर यांच्याहस्ते पार पडला. हे चित्रांचे प्रदर्शन दि. १६ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. हे प्रदर्शन सकाळी ११ ते संध्याकाळी ७.३० पर्यंत सर्वांना पाहता येईल.
या प्रदर्शनात तीसहून अधिक चित्र मांडलेली आहेत. ही चित्रे जलरंग आणि ऍक्रेलिक माध्यमातून केलेली आहेत. कोकण, बेळगाव, नेपाळ, हंम्पी, शिमला, गोवा आणि बदामी येथे रेखाटलेली चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.