बेळगाव : भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शहरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी शहरातील छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज सर्कल परिसरातील शंभूतीर्थ येथे पूजा-अर्चा करून महाराजांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना माजी आमदार संजय पाटील यांनी धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाचा उल्लेख करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. हिंदू समाजासाठी त्यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे सांगत, १४ मे रोजी प्रत्येक घरात संभाजी महाराज जयंती उत्सवाप्रमाणे साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिवशंभू भक्त आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.