बिजगर्णी : येथील पश्चिम विभाग शिक्षण संस्था संचलित बिजगर्णी हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप तसेच शैक्षणिक साहित्य दिले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस एम जाधव उपस्थित होते. विद्यार्थिनीनी स्वागतगीत सादर केले. दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले प्रास्ताविक वाय. एच. पाटील यांनी करून राबवित असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला.

यावेळी विद्यार्थी मंत्रिमंडळ निवड करण्यात आली.शालेय कामकाज शिस्तप्रिय व्हावे , विद्यार्थी दशेत सुयोग्य नियोजन, व्यवस्थापन होऊन सामाजिक मूल्यांची जपणूक करणे यासाठी, मुख्यमंत्री, सहल मंत्री, सांस्कृतिक, क्रीडा विभाग शालेय मंत्रीमंडळ बनविले व शपथ विधी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

वाय. पी. नाईक प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना, विद्यार्थी हा भविष्यात राष्ट्र निर्मितीचा पाया आहे.शाळेच्या ज्ञान मंदिरात योग्य संस्कार घडत असतात.व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी सामाजिक भान ठेवून विद्यार्थी प्रामाणिक प्रयत्न करून माणूसपण जपलं पाहिजे.शिक्षणामुळे जीवन समृद्ध होते.यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते संस्था, शिक्षक व विद्यार्थी यांचा समन्वय असणे आवश्यक ठरते असे मौलिक विचार व्यक्त केले. अनेक मान्यवरांनी दिलेल्या देणग्यातून गणवेश, वह्या, बॅग,शिक्षणोपयोगी साहित्याचं वाटप यावेळी करण्यात आले.

सुरेश कांबळे,एस एम जाधव यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर यल्लापा बेळगावकर, पुंडलिक जाधव, संतोष कांबळे, निंगाप्पा बर्डे, पुंडलिक कोळी, मनोहर पाटील, कल्लापा अष्टेकर, के. आर. भास्कर, एम. एम. जाधव, अर्जुन निलजकर, मनोहर मोरे, बंडू भास्कर, रामचंद्र हलकर्णीकर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन आर. पी. सरवणकर यांनी केले. आभार रमेश कांबळे यांनी मानले.