बिजगर्णी : येथील ज्येष्ठ नागरिक, प्रगतशील शेतकरी आणि कुस्ती क्षेत्रातील मान्यवर पैलवान म्हणून ओळख असलेले गोपाळ रामू भाष्कळ (वय ७८) यांचे शुक्रवार (दि. २४ जुलै) सायंकाळी निधन झाले.

शनिवारी (दि. २५ जुलै) सकाळी ११ वाजता गावच्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रेमळ, मनमिळावू आणि सर्वांना आपलेसे करणारा स्वभाव ही त्यांची ओळख होती. गावातील कुस्ती परंपरा जपण्यासाठी आणि आखाड्यांचे आयोजन करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान होते.

ते निवृत्त क्रीडा शिक्षक के. आर. भाष्कळ यांचे ज्येष्ठ बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, दोन बहिणी, एक भाऊ, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी होणार आहे.