बेळगाव : श्री दत्त पद्मनाभ पीठ, बेळगाव-कर्नाटक यांच्या वतीने पीठाधीश्वर परमपूज्य सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांच्या गुरुपीठारोहण रजत महोत्सवानिमित्त ‘गुरुः साक्षात् परब्रह्म’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. हा सोहळा मराठा मंदिर सांस्कृतिक भवन, बेळगाव येथे सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे.
श्री दत्त पद्मनाभ पीठ हे आध्यात्मिक साधना, वैदिक संस्कृती, धर्मशिक्षण आणि समाजसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले एक प्राचीन व पवित्र आध्यात्मिक केंद्र आहे. सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली पीठाच्या माध्यमातून आध्यात्मिक जागृतीबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक कार्याला प्रोत्साहन दिले जात आहे.
स्वामीजींनी अध्यात्म, संस्कृती, शिक्षण आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला सकारात्मक दिशा देण्याचे कार्य केले आहे. वैदिक शिक्षण, संस्कृत भाषा, महिला पुरोहित प्रशिक्षण, महिला वेदविदुषी आणि वैदिक कन्यांच्या शिक्षणासारख्या उपक्रमांद्वारे भारतीय ज्ञानपरंपरेचे जतन व संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘सद्गुरू ज्ञानपीठ’ आणि गुरुकुल पद्धतीच्या माध्यमातून संस्काराधिष्ठित शिक्षणालाही चालना दिली जात आहे.
स्वामीजींच्या आध्यात्मिक व सामाजिक कार्याची दखल विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर घेण्यात आली आहे. त्यांच्या कार्यामुळे आध्यात्मिक मूल्ये, भारतीय संस्कृती आणि मानवकल्याणाचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचत आहे.
गुरुपीठारोहणाच्या रजत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित हा कार्यक्रम स्वामीजींच्या आध्यात्मिक कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि त्यांच्या मार्गदर्शनातून प्रेरणा घेण्याची संधी ठरणार आहे. या मंगल सोहळ्यास बेळगाव व परिसरातील सर्व भाविक-भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
॥ सर्व राष्ट्रप्रेमी व धर्मप्रेमी भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत ॥
संपर्क :-
श्री सोपान पाटील 8970236354
श्री वैजू गुरव 9448635193
श्री निवृत्ती पाटील 98449 92074
डॉ.गौरेश भालकेकर 8747868265








