बेळगाव : बेळगावात नवरात्र उत्सवानिमित्त ऐतिहासिक वारसा असलेल्या दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे.येत्या ११ ऑक्टोबरपासून शहरातील विविध भागासह ग्रामीण परिसरात दुर्गामाता दौड काढण्यात येणार आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी योग्य नियोजन करून ही दौड यशस्वी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी झालेल्या बैठकीत जिल्हाप्रमुख विश्वास पाटील यांनी दौड सुरळीत आणि शिस्तीने पार पाडण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडावी, असे आवाहन केले.

या बैठकीला कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे, तालुकाप्रमुख कुसुम कोकितकर, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, शहरप्रमुख अनंत चौगुले यांच्यासह शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आगामी दौडीच्या नियोजनासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.