बेळगाव ता. २८ : नॉर्थ कर्नाटक, साऊथ महाराष्ट्र आणि संपूर्ण गोवा राज्याच्या रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० च्या गव्हर्नर पदासाठी झालेल्या निवडणुकीत बेळगांव येथील रोटरी क्लब ऑफ बेळगांव साऊथ चे सदस्य रोटे. अशोक नाईक हे विजयी झाले आहेत.

बेळगाव येथील बी. के. मॉडेल स्कूलमध्ये ही निवडणुक पार पडली आणि या निवडणुकीत कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या रोटरी सदस्यांनी मतदानात भाग घेतला होता. अतिशय उत्साही वातावरणात ठाणे जिल्ह्याचे माजी प्रांतपाल डॉ. गांगुली यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणुक पार पडली.
रोटे. अशोक हे डिस्ट्रिक्ट ३१७० कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा ह्या तीन राज्याचे गव्हर्नर म्हणून २०२७ – २८ साली कार्यरत असतील. आंतरराष्ट्रीय रोटरीची स्थापना १९०५ साली झाली आहे आणि आज १२० वर्षाच्या इतिहासामध्ये बेळगाव मधून आता पर्यंत फक्त ९ रोटरियननी गव्हर्नर म्हणून काम केले आहे. अशोक नाईक हे बेळगाव मधून निवडून आलेले १० वे गव्हर्नर आहेत. अत्यंत महत्त्वाच्याआणि मानाच्या पदासाठी निवडून आल्या बद्दल श्री. अशोक नाईक यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. अशोक नाईक हे एक बांधकाम व्यावसायिक असून बेळगाव चे सरपंच आणि प्रसिद्ध वकील कै. पी जे नाईक यांचे चिरंजीव आहेत.