बेळगाव : टिळकवाडी येथील वीर सौध योगा केंद्रातर्फे आषाढी एकादशीच्या निमित्ताने ह. भ. प सौ.अश्विनी सरनोबत यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते संत कान्होपात्रा यांच्या अभंगातून भक्तीचा जागर त्यांनी रसाळ, ओघवत्या शैलीतून मांडणी करून संतांचे विचार मानसिक समाधान देतात.आध्यात्मिक हाच खरा मानवी धर्म आहे जीवन कृतार्थ होण्यासाठी नामाचा जयघोष करा.संत तुकाराम, एकनाथ महाराज, नामदेवांनी भक्तीचा मार्ग अठरा पगड जातीला दाखवून जगण्याचा अधिकार दिला लाखो भाविक पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल,जय जय राम कृष्ण हरी हा जयघोष करीत पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेतात.हा एकतेचा संदेश संतांनी दिला.असे विविध दृष्टांत देऊन संतमहती कथन केली.

प्रारंभी विठ्ठल प्रतिमेचे पूजन योग प्रशिक्षक गोपाळराव देशपांडे यांच्याहस्ते करण्यात आले. उषा दळवी व विजयालक्ष्मी मायकलवार यांनी सौ. अश्विनी रवि सरनोबत यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
प्रास्ताविक व परिचय वाय. पी. नाईक यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रय कुरविनकोप यांनी केले. आभार प्रा. भूदेवी पुरोहित यांनी मानले. यावेळी उमेश सुपाले रवींद्र सुतार गीता देशपांडे, शोभा दुर्वे, पल्लवी मदली,वर्षा शानबाग, बीना मुन्नोळकर, स्मिता निंबाळकर, सुलक्षणा जाधव, नारायण नवखणकर, शामल पाटील आदि सदस्य उपस्थित होते.







