- उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी प्रशासनाचा निर्णय
बेळगाव / प्रतिनिधी
उड्डाणपुलाच्या कामासाठी आधीच जाहीर केल्याप्रमाणे शुक्रवार दि. २० जून रोजी चौथे रेल्वेगेट वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी यासंबंधीची सूचना दिली होती. या मार्गावरील वाहतूक वळविल्याचेही त्यांनी सांगितले होते.
२० जून २०२५ पासून १९ जून २०२६ पर्यंत तब्बल वर्षभर उड्डाणपूल उभारण्याच्या कामानिमित्त चौथे रेल्वेगेट वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. अनगोळहून बेम्कोकडे जाणारी वाहतूक अनगोळ येथील धर्मवीर संभाजी चौक, हरि मंदिर रोड, अनगोळ नाका, तिसरे रेल्वेगेट पुलावरून खानापूर रोडला वळविण्यात आली आहे. खानापूरहून अनगोळकडे येणारी वाहतूक को सर्कलपासून तिसरे रेल्वेगेट, अनगोळ नाका, हरि मंदिर रोडमार्गे वळविण्यात आली आहे. शुक्रवारी चौथ्या रेल्वेगेटवर बॅरिकेड्स उभारण्याबरोबरच जेसीबीने चर खोदून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. यावेळी वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.