• कॅलिफोर्निया ‘बे एरिया’ तील रसिकांसाठी २ ऑगस्टला विशेष प्रयोग
  • हाऊसफुल्ल प्रतिसाद

बेळगाव : कॅलिफोर्निया येथील ‘बे एरिया’ तील प्लेझन्टन शहरात रविवार दि. 2 ऑगस्ट रोजी ‘ वाऱ्यावरची वरात ‘ चा प्रयोग करण्यात येणार आहे. येथील ‘ बे फ्रेंड्स ‘आयोजित आणि’ कुंकु प्रॉडक्शन्स ‘ निर्मित हा नाट्याविष्कार विलो रोड वरील जय गणेश स्टुडिओ येथे सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

मूळ लेखन पु. ल. देशपांडे यांचे असून मेधा मराठे यांनी संपादित केलेल्या ‘वरातीचे’ दिग्दर्शन जगदीश कुंटे यांनी केले आहे. बेळगाव व नाशिक येथील तसेच कॅलिफोर्निया मधील, मुख्यतः कुंटे आणि कुलकर्णी कुटुंबातील सदस्य या प्रयोगात सहभागी आहेत.

प्रथम भालचंद्र कुंटे हे बेळगावचे कवि अविनाश ओगले यांच्या निवडक विडंबन कविता सादर करणार आहेत. मध्यंतरानंतर ‘ वाऱ्यावरची वरात ‘ सादर होईल. प्रयोगाला मुक्त प्रवेश असून नाव नोंदणीद्वारे उस्फूर्त प्रतिसाद मिळून प्रयोग हाऊसफुल्ल झाला आहे.