बेळगाव : अलतगा कडोली संपर्क रस्त्यावर अलतगा हद्दीत भले मोठे खड्डे पडले असून रस्तात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे दुचाकी वाहन तसेच मालवाहू रिक्षा चालकांनी या रस्त्यावरुन या प्रवास करण्याचे बंद केले आहे. विशेष म्हणजे अगसगे चलवेनहट्टी हंदिगनूर म्हाळेनट्टी या परिसरातून शालेय विद्यार्थ्यांसाठी परिवाहनची बस वाहतूक सुरू आहे. त्यामुळे सदर रस्ता पार करण्यासाठी वेळ लागत असून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. परिणामी सकाळी आणी संध्याकाळी अशा दोनच बसफेऱ्या येथून सुरु आहेत. त्यामुळे प्रशासन मोठा अपघात घडण्याची वाट पाहत आहे का शंका व्यक्त होत आहे.
