- सेंट्रल रेल्वेच्या जनरल चॅम्पियनशिपमध्ये मोलाचे योगदान
बेळगाव : कोलकाता येथील आसनसोलमध्ये पार पडलेल्या ५९ व्या अखिल भारतीय आंतररेल्वे नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत (59th All India Inter Railway Shooting Championship) सेंट्रल रेल्वेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोल्हापुरच्या राधिका बराले (हवालदार) हिने उल्लेखनीय कामगिरी केली. १० मीटर एअर रायफल प्रकारात तिने सांघिक कांस्यपदक पटकावत रेल्वेच्या क्रीडा क्षेत्रात बेळगावचा नावलौकिक वाढविला.
या स्पर्धेत राधिकाने अचूक नेमबाजी आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सेंट्रल रेल्वेच्या पदकप्राप्तीत महत्त्वाची भर घातली. विशेष म्हणजे, सेंट्रल रेल्वेला जनरल चॅम्पियनशिपचा मान मिळवून देण्यातही तिचे योगदान मोलाचे ठरले. तिच्या या यशामुळे रेल्वेच्या क्रीडा क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, राधिका बराले आणि रोहित हवालदार यांचा सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव, सुनीता सावंत आणि वंदना बाळेकुंद्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राधिकाच्या यशाचे कौतुक करताना उपस्थितांनी तिच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.








