सौंदत्ती : अधिक मासात सौंदत्ती डोंगरावर उद गं…आई उदं चार गजर आणि भंडाऱ्याची मुक्त उधळण करत भाविकांनी सौंदत्ती श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.

गेल्या आठ सप्ताह भरात तब्बल १ लाखांहून अधिक भाविकांनी रेणुका देवीचे दर्शन घेतले. अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण यल्लमा डोंगर गर्दीने फुलून गेलेला पाहायला मिळत आहे.मंगळवार आणि शुक्रवारी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. डोंगरावर देवी दर्शनाला येण्यापूर्वी जोगनभावी कुंडावर स्नानासाठी भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.