बेळगाव : दरवर्षीप्रमाणे वारकरी महासंघ बेळगाव यांच्या पायीदिंडी सोहळ्याचे प्रस्थान आज सोमवारी दि. १६ जून रोजी सायंकाळी श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, महाद्वार रोड येथून झाले आहे.आषाढी पायी दिंडी सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वारकरी महासंघ बेळगावने केले आहे. बेळगाव येथून आज सोमवारी निघालेली वारकरी महासंघ बेळगावची पायी दिंडी गुरुवारी १९ जून रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून माऊलीच्या पालखी बरोबर उखळीकर दिंडी क्र. 4 (रथामार्गे) या दिंडीतून मार्गस्थ होणार आहे. गेली तीस वर्ष बेळगाव वारकरी महासंघाच्या वतीने आषाढी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे.बेळगाव आणि परिसरातील ५०० हून वारकरी महासंघाच्या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होत असतात.अशी माहिती ह.भ.प. शंकरराव बाबली यांनी दिली. दि. ६ जुलै रोजी पंढरपूर येथे आषाढी एकादशी सोहळा संपन्न होणार आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथील महासंघाच्या वास्तूमध्ये द्वादशी महाप्रसाद होऊन या पायी दिंडीची सांगता होणार आहे.