बेळगाव : अनगोळ रोड, टिळकवाडी येथील सुप्रसिद्ध आदर्श मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वतीने सभासदांच्या गुणी मुलांचा गौरव करण्यात येणार आहे. गेल्या मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या दहावी, बारावी, पदवी किंवा पदविका परीक्षेत 75 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळविलेल्या तसेच अभियांत्रिकी, वैद्यकीय, एमबीए, एमसीए, सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि पीएच. डी. प्राप्त मुलांचा गौरव करण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत अनगोळ रोड, टिळकवाडी येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात दि. 15 जुलैपर्यंत आणून द्यावी, असे आवाहन दि आदर्श मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे चेअरमन एस. एम. जाधव यांनी केले आहे.
March 18, 2026
रस्त्याच्या किरकोळ वादातून नातेवाईकाची हत्या ; आरोपी पोलिसांच्या ताब्यात बैलहोंगल / वार्ताहर बैलहोंगल तालुक्यातील दोडवाड येथे घडलेल्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना अवघ्या एका दिवसात यश […]








