मुंबई / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष अधिकारी व उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या 15 जून 2025 रोजी वाढदिवसानिमित्त ठाणे येथे कार्यक्रमात सीमा भागात वैद्यकीय सेवेबद्दल वैद्यकीय समन्वयक प्राचार्य श्री आनंद आपटेकर यांना कृतज्ञता पत्र देऊन सन्मान करण्यात आला. येणाऱ्या काळात अजून चांगल्या रीतीने सीमाभागात वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे आपण चांगले प्रयत्न करत राहू असे आश्वासन चिवटे यांनी दिले. मंगेश चिवटे यांना फोनवरून माजी महापौर मालोजी अष्टेकर, रमाकांत कोंडुस्कर, विकास कलघटगी यांनी शुभेच्छा दिल्या.ठाणे आनंद आश्रम कार्यालयाचे विलास कळण व डॉ. बापूसाहेब आडसुळ उपस्थित होते.








