बेळगाव : चव्हाट गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक गुंडू खेमाजी गुंडकल (वय ८९) यांचे आज मंगळवार दि. १० नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते अनिल गुंडकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, दोन विवाहित मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांचावर आज दुपारी १२.३० वा. चव्हाट गल्ली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.