• हिडकल जॅकवेलमधील पंपिंग प्रक्रिया बंद
  • शहरातील विविध भागांत पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता

बेळगाव : बेळगावात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा परिणाम आता शहराच्या पाणीपुरवठ्यावरही झाला आहे. हिडकल जॅकवेल येथे सुरू असलेल्या आंदोलनामुळे पाणी उपसा प्रक्रिया थांबवण्यात आली असून, शहरातील विविध भागांतील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गुरुवारी दुपारी १.५० वाजण्याच्या सुमारास हिडकल जॅकवेल येथील पाणी उपसा प्रक्रिया बंद करण्यात आली. त्यामुळे बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. पंपिंग प्रक्रिया पूर्ववत सुरू होईपर्यंत शहरातील विविध भागांत पाणीपुरवठ्यात व्यत्यय येऊ शकतो.

संबंधित अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.